मुंबई: दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार आहे. राज्य शासनाने चारा खरेदीचे दर निश्चित केले आहेत. सुक्या चाऱ्याची कमाल आधारभूत किंमत व. सुक्या चाऱ्याची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो १२ रुपये, तर मूरघासाची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो ८ रुपये निश्चित केली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत एकूण ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.