मालेगाव : पुढारी वृत्तसेवायेथील मनपा आयुक्तपद रिक्त झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याब. याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने आदेश जारी केला आहे..प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..विशेष म्हणजे, भाग्यश्री विसपुते या मालेगावच्या कन्या असून, त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे.