Amit Shah on Vote Choriलखनऊ: "विरोधी पक्षांनी केलेल्या 'मत चोरी'च्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी या चर्चेसाठी कधीही तयार होणार नाहीत," असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. .लखनऊमध्ये शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. शहा म्हणाले की, "मी 'मत चोरी'च्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे. पण राहुल गांधी कधीही याला सहमत होणार नाहीत.