Pimpri-Chinchwad Fire News: वडिलांचा विरोध झुगारून तिने गॅलरीतून उडी मारली. पायाला गंभीर दुखापत झाली, तरीही स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले आणि सर्वांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले. पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील भीषण (Pimpri-Chinchwad Fire News) आगीला भिडून, तब्बल 70 ते 80 रहिवाशांना जीवदान देणाऱ्या 20 वर्षीय आर्या कांबळे हिच्या अद्वितीय शौर्याची आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.