Jiya Shankar: ऑगस्टमध्ये जिया शंकरने तिचं नातं जगजाहीर केलं होतं. त्यानंतर आता तिने होणाऱ्या नवऱ्याला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. Jiya Shankar: रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात झळकलेली आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच जियाने बॉयफ्रेंड करण धनकसोबत साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र, आता या जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.