सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नऊ मतदारसंघ बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरित जागांवरील राजकीय संघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे. विशेषतः. विशेषतः राखीव मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांमध्येच एकमेकांना राजकीय चेक देण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे. वरकरणी महायुती एकत्र असल्याचे दाखवले जात असले, तरी जिल्हा बँकेच्या सत्तेतील आपापले राजकीय वजन वाढवण्यासाठी घटक पक्षांनी स्वतंत्र व्यूहरचना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..