सांगली : शहरातील विजयनगर चौक ते रेल्वे ब्रीज रस्त्यावर माशांचा स्टॉल लावल्याच्या वादातून एका टोळक्याने स्टॉलचालक महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात. हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोरांनी स्टॉलचे सामान, मोबाईल आणि परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..प्रवीणा शिवराज जावीर (वय ३९, रा. संजीवन हनुमान मंदिरामागे, विनायकनगर, सांगली) असे जखमी स्टॉलचालक महिलेचे नाव आहे.