Guru Shani Shadashtak Yog: 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु ग्रहाच्या सिंह राशीतील गोचरामुळे शनी आणि गुरु यांच्यामध्ये षडाष्टक योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा तीन राशींवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहार, करिअर आणि कौटुंबिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या गोचरला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे वेगवेगळे योग निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याचे मानले जाते.