#INS #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'वर फ्रान्सच्या राफेल मरीन लढाऊ विमानानं पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग आणि टेक-ऑफ केलं. भारतीय नौदलानं या थरारक लँडिंगचा एक शानदार व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केला. गोवा किनारपट्टीवर सुरू असलेल्या सागरी चाचण्यांदरम्यान एका फ्रेंच वैमानिकानं राफेल मरिनचं उड्डाण केलं. समुद्राच्या मध्यभागी धावणाऱ्या युद्धनौकेच्या डेकवर लढाऊ विमान उतरवणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असतं.