Youth Death Case Jalna शहागड : व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून एका तरुणाला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे..व्याजाच्या व्यवहारातून छळ केल्याचा आरोपफिर्यादी दीपक शिंदे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विलास शिंदे याला संबंधित पाच जणांनी व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून एकत्रितपणे शारीरिक व मानसिक त्रास दिला.