ठाणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता प्रत्येकी २५ हजार रुपये बो. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे..गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २४ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आले होते. यंदा त्यामध्ये वाढ करून थेट २५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.