Thane Crime news: आदित्य ठाकरेंच्या आंदोलनाला आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी उचललं, पोलीस ठाण्यात कपडे काढले, तेल लावून नाजूक जागी मारहाण, अंतर्वस्त्र डोक्यात घातली. Ram Purnekar Thane Police Crime news: ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले असताना राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे गुरुवारी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला गेले होते. यानंतर त्यांनी ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्तांची भेट घेतली होती.