Pune Crime News: गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी वाहन उभे होते. पुणे : पुण्यातील सारसबाग परिसरात एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. अल्टो गाडीत मृतदेह (Pune News) आढळला आहे. सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असून, आज गाडी असलेल्या परिसरात दुर्गंधी (Pune News) येऊ लागल्याने घटना उघड झाली आहे.