जर सुरुवातीपासूनच लग्नाची खोटी आश्वासने देऊन किंवा फसवणूक करून संमती मिळवली गेली असेल, तर अशा प्रकरणांमध्ये, संमती खरोखरच फसवणुकीवर आधारित होती की नाही हे तपासणे गरजेचं असल्याचं न्यायालयाने सांगितलं. Supreme Court on Rape: नातेसंबंध तुटल्यानंतर प्रौढ पुरुष आणि स्त्री यांच्यातील परस्पर संमतीने झालेले शारीरिक संबंध बलात्कार मानले जाऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. लग्नाचे वचन देऊन संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.