सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नाशिकचा रामकुंड परिसर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास अवघे 17 दिवस उरले असून, प्रलंबित कामे तातडीनं पूर्ण करण्यासाठी रामकुंड परिसर 31 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावर्तापाठोपाठ आता रामकुंडही बंद राहणार असल्यानं भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे.