Vidhan parishad Election : निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतात. मात्र, पराभवाची कारणे समजून न घेता पुढे जाणे योग्य नाही. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निकाल हा पक्षासाठी आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. संघटनेच्या कामकाजात कुठे सुधारणा करण्याची गरज आहे? मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि पदवीधर मतदारांच्या अपेक्षा काय आहेत? याचा अभ्यास केला जाईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.