India vs New Zealand 4th T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज ऑकलंडमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडमधील भारताची सलग तीन सामन्यांची विजयी मालिका अखेर चौथ्या सामन्यात संपुष्टात आली. ईडन पार्कवर विजय मिळवायचा असेल, तर भारताला त्यांच्या टी-20 इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे आवश्यक होते. मात्र 260 धावांच्या विशाल लक्ष्याचा सामना करताना संपूर्ण संघ केवळ 172/9 धावाच करू शकला.