सांगली : जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचे धुराडे पेटले आहे. वाळवा तालुक्यात ऊस कार्यक्षेत्र असणारा कृष्णा, राजारामबापू, हुतात्मा तसेच अन्य तालुक्यांतील. ऊस दरासाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना, रघुनाथ पाटीलप्रणित शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना अशा सर्वच संघटनांनी भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे संघटनांची धार बोथट झाली की काय, अशी चर्चा शेतकरी करू लागले आहेत.