सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि. २६) पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत ५१६ अर्जांची विक्री झाली आहे. मागील तीन दिवसांत ६९ जण. मागील तीन दिवसांत ६९ जणांनी अर्ज दाखल केले. सिद्धाराम म्हेत्रे, भाजपचे नेते शहाजी पवार, प्रथमेश म्हेत्रे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, रणजितसिंह शिंदे, मनीष देशमुख, अमोल शिंदे, अस्मिता गायकवाड यांच्यासह तब्बल ५४ जणांनी अर्ज दाखल केले. उर्वरित नेते उद्यापर्यंत अर्ज दाखल करणार आहेत. .