पिलीव : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शेतकरी लक्ष्मण मुरलीधर वगरे यांच्या सुळेवाडी हद्दीतील दीड एकर उसाला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात तीन लाख रुपयांचे नुकस. यात तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी विहिरीतून पाणी आणून प्रयत्न केला आहे, मात्र असफल झाला..उसाच्या वरून गेलेल्या विद्युत वाहिनीत एकमेकीला घर्षण होऊन उसाच्या उभ्या पिकावर ठिणग्या पडल्या. दीड एकर उसाला आग लागून सदरचा ऊस जळून खाक झाला.