संगमनेर: थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून संगमनेर खुर्द येथे दोघांनी महावितरणच्या २४ वर्षीय वायरमनला बेदम मारहाण करून कारखाली चिरडण. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अजीज उर्फ बाबू छोटू कुरेशी (वय २८) आणि मोबीन शाकीब कुरेशी (वय २६, दोघेही रा. संगमनेर खुर्द) यांना अटक केली आहे..महावितरणच्या पिंपरणे कक्षांतर्गत कार्यरत असलेले ओंकार भानुदास सातपुते हे वरिष्ठांच्या सूचनेनुसार थकीत वीजबिलापोटी वीजजोड खंडित करण्यासाठी गेले होते.