मुंबई : राजकीय पटलावर एकमेकांविरुद्ध जोरदार राजकीय शरसंधान साधणारे दिग्गज नेते गुरुवारी (दि.२९) कलेच्या आणि हास्याच्या धाग्याने एकत्र आले. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या व्यंगचित्र संग्रहाचे प्रकाशन शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर एकत्र आल्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे.