वेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानता का नाही? तुम्ही पक्ष फोडले, संघटना फोडल्या. एक नामवंत दूध संघ केवळ आपल्या पसंतीचा अध्यक्ष होत नाही, म्हणून त्याच्या पाठीमागे अशा प्रकारची शुक्लकाष्ट लावताय? जरा तर काही तुम्हाला वाटत नाही? गोकुळच्या अध्यक्षपदासाठी कोरमअभावी सभा तहकुब झाल्याने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. बहुमत मिळालेल्या आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते.