- पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच; कारवाईदरम्यान मंत्र्याचा फोन; वडगाव खु. प्लांटवर कारवाई नसल्याने भेदभावाचा आरोप. - हिरा सरवदेपुणे : धायरी येथील कालव्यालगतच्या सहा रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर महापालिका प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाई केली. मात्र, या कारवाईत प्लांटमधील मुख्य यंत्रणा आणि संरचना कायम ठेवत केवळ पत्र्यांची शेड पाडून सायलो सील करण्यात आले. त्यामुळे कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.