गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यात एक हजारांची वाढ करून महापालिका प्रशासनाने यंदा ३२ हजार रुपये बोनस देण्याची तयारी केली होती. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या ८८ हजार ७५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा ३३ हजार रुपयेपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी बुधवारी केली. बोनसची रक्कम आणि महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी २ नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.