घाटकोपर ‘एन’ विभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण सात आरएमसी कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांना वायू प्रदूषण प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी ५ ऑक्टोबरला नोटीस देण्यात आली होती. . लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वायु प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नोटीस पाठवूनही उपाययोजना न केल्याबद्दल घाटकोपर 'एन' विभागातील सात रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) कारखान्यांना मुंबई महापालिकेने दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे.