लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिवाळी आणि फराळ हे एक समीकरणच आहे. त्यातही आई-आजीच्या हातचा फराळ असेल तर फराळाचा ... त्यातही आई-आजीच्या हातचा फराळ असेल तर फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. नोकरी-शिक्षणानिमित्त भारतापासून हजारो किलोमीटर दूर परदेशात स्थायिक झालेल्या मुला-मुलींना फराळाचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी अनेक कुटुंबे दरवर्षी फराळ पाठवतात. मात्र, यंदा रेडीमेड फराळ व तो पाठवण्याचा वाढलेला खर्च, यामुळे परदेशात फराळ पाठवण्यात हात आखडता घेतल्याचे व्यापारी म्हणाले.