चिंचपाडा मैदानाच्या बाजूला, खटाव मिलच्या परिसरातील उपलब्ध खुल्या भूखंडावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी व स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी व स्थानिक रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करून रो-हाऊस बंगला योजना, दोन टॉवर इमारती, खुला प्रवेशमार्ग व प्रत्येक घराच्या मालकाच्या नावे मालमत्तेचे कायदेशीर हक्क देण्यात यावेत.