Nagpur Graduate Constituency Result: मुख्यमंत्री, बावनकुळे फिरले; कार्यकर्त्यांनी गमावले : भाजपचे सूक्ष्म नियोजन फसले; नागपुरात कराळेंची १० हजारांवर मते. - योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला. बंडखोरीपासून सुरू झालेली लढाई, नाराजांची मनधरणी, सामाजिक घटकांशी संवाद आणि बूथस्तरावरील सूक्ष्म नियोजन अशा अनेक आघाड्यांवर भाजपने ताकद लावली. मात्र, नेत्यांच्या धडाकेबाज प्रचारानंतरही प्रत्यक्ष मतदानाचे गणित पक्षाला जुळवता आले नाही.