सातारा : राजकारणात कायमस्वरूपी कोणी कोणाचा मित्र किंवा विरोधक नसतो, याचा प्रत्यय साताऱ्यातील महायुतीच्या मेळाव्यात आला. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर आरोप-प. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेचे माजी सभापती आ. निंबाळकर आणि हे शेंद्रे येथील मेळाव्यात शेजारी-शेजारी बसले. एवढेच नव्हे, तर दोघांमध्ये बराच वेळ गप्पांचा फडही रंगला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे..