सातारा : कातवडी, ता. सातारा गावचे माजी सरपंच हणमंत राणू देवरे (वय ५२) यांचा उरमोडी धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्याव. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. .हणमंत देवरे मंगळवारी सकाळी वडाचा माळ परिसरात भुईमूग काढण्यासाठी गेले होते. उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने ते हातपाय धुण्यासाठी उरमोडी धरणात गेले असता पाय घसरून पाण्यात पडल्याची शक्यता आहे. ते बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.