सागर गुजर सातारा : सातारा वनविभागाने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये ४०० वनराई बंधाऱ्यांची कामे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तयार केलेले वनराई बंधारे वन्यजीवांसाठी नवसंजीवनी ठरले आहेत..पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अडवून त्याचा उपयोग व्हावा, यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी महत्त्वपूर्ण ठरते. या बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला चालना मिळण्यासोबतच भूजल पुनर्भरण आणि स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनास मदत होते.