सातारा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील तब्बल १०९ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यापासून पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. .यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सेवक सहकारी पतसंस्था, पिंपळे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच फलटण तालुक्यातील काही संस्थांचा समावेश आहे. या निर्णयामुळे सहकारी संस्थांतील राजकीय घडामोडींना ब्रेक लागणार आहे..