उचगाव : येथील मठ गल्लीत मंगळवारी मध्यरात्री घर फोडून सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मठ गल्ली येथील लक्ष्म. झोपेत असलेल्या लक्ष्मी यांच्या तोंडावर उशी दाबून चोरांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पाटी बळजबरीने काढून घेतली आणि पोबारा केला. वृद्ध असल्यामुळे लक्ष्मी यांना चोरांचा प्रतिकार करता आला नाही. झटापटीत दागिने ओढताना त्यांच्या तोंडावर जखमाही झाल्या आहेत.