मुंबई: रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सने बुधवारी शेअर बाजारात दणक्यात पदार्पण केले आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी हा शेअर १,३५८ रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध. आयपीओमध्ये प्राईस बँड १,११९ रुपये होता. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी २१ टक्क्यांचा लिस्टिंग फायदा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना प्रतिशेअर २३९ रुपयांचा नफा झाला आहे.यानिमित्ताने आयोजित दिमाखदार सोहळ्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले होते.