सोलापूर : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे. प्रशासनाने सानुग्रह अनुदानाच्या रकमेत ९०० रुपयांची वाढ केली असून पात्र कर्मचाऱ्यांना यंदा ४ हज. गेल्यावर्षी हे अनुदान ३ हजार ६०० रुपये होते. सणासाठी दिले जाणारे १२ हजार ५०० रुपयांचे अग्रिम कायम ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. सचिन ओम्बासे यांच्या मान्यतेनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.