सांगली : शिक्षकांची अनियमित उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतील त्रुटींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिरज तालुक्या. १ वर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्याध्यापक उत्तम पाटील यांच्यासह दोन उपशिक्षिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता समाधानकारक नसल्याप्रकरणी अन्य चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा होईपर्यंत या चारही शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत..