नागपूर : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमे. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांवर त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मागे टाकत ही निवडणूक जिंकली..या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा आणि चुरशीचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी मिळवली होती, मात्र आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली.