नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खर्गेे. खर्गेे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोशल मीडियावर एक विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी भाजपने ‘मोदी कहीं नहीं जायेगा’ या शीर्षकाचे एक प्रचारगीत प्रसिद्ध केले असून, पंतप्रधानांना जनतेचा भक्कम पाठिंबा असल्याचे यात म्हटले आहे.