Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 सतीश चव्हाण यांच्या पराभवाचं विश्लेषण करताना विविध कारणमिमांसा केली जातेय. संभाजीनगर : राज्यातील पाच विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला तीन जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या आहेत. मात्र, येथील निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सलग तीनवेळा विजय मिळवणारे राष्ट्रवादी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सतीश चव्हाण (Satish chavan) यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला.