पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख आणि मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाल्याने विधानपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे मोठं यश मिळालंय. मुंबई : राज्यातील पाच विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकांचे निकाल हाती आले असून दोन्ही शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, तीन पैकी 2 पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. नागूपर पदवीधर मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. त्यामुळे, 5 पैकी तीन जागा जिंकत भाजपा महायुतीने वर्चस्व मिळवले.