Raj Thackeray News: राज ठाकरेंनी आज कर्जतमध्ये सभा घेतली आहे. वृक्षतोडीवरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. भीमाशंकरच्या जंगलात मोठी वृक्षतोड सुरू आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे आज वृक्षतोडीची माहिती घ्यायला कर्जतमध्ये गेले होते. त्यांनी भाषणातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारवर मोठी टीका केली आहे. राज ठाकरेंनी अमित शाहांना थेट इशारा दिला आहे.