उलट्या लटकलेल्या बाईकवर बसा आणि'फ्रि' मध्ये बाईकघरी घेऊन जा.दुकानदाराची ही भन्नाट आयडिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दिवाळीत कुठे मिठाईवर ऑफर मिळते, तर कुठे कपड्यांवर सूट पाहायला मिळते. पण एखाद्या दुकानात गेल्यावर दुकानदार म्हणाला की, 'ही बाईक मी तुम्हाला भेट देतो, बास फक्त त्या उलट्या लटकलेल्या बाईकवर बसून दाखवा. असाच एक भन्नाट प्रकार एका दुकानादाराने केला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.