तीन लाखांवर शेतकऱ्यांना आधार : खरीप हंगामातील भरपाईसाठी शासनाची पावले. सातारा : राज्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप हंगाम वाय गेला. त्यामुळे राज्य शासनाने ३०० हून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून या अंतर्गत दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर असून तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे १५० ते २०० कोटी रुपये येऊ शकतात.