ठाणे : वडापाव खरेदीसाठी पाचशे रुपयांची बनावट नोट देणे अंधेरीतील तरुणाला चांगलेच महागात पडले. वागळे इस्टेटमधील पडवळ नगर परिसरात वडापाव विक्रेत्याला बनावट नोट देऊ. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या १२, म्हणजेच सहा हजार रुपये किमतीच्या संशयित बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे..वागळे इस्टेटमधील पडवळ नगर येथे नितीन गावड यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एक तरुण त्यांच्या गाडीवर आला.