संजय राऊत यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना नागपूरमध्ये काटे की टक्कर असल्याचे म्हटले. शिक्षक मतदारसंघात मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील भूमिकेवरून राऊत यांनी टीका केली. विधानपरिषद निवडणुकांचे निकाल येत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये "काटे की टक्कर" असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीसाठी आशादायी असल्याचे चित्र आहे, असे राऊत यांनी नमूद केले.