Pune MLC Election BJP Result 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपसाठी चांगली बातमी आली आहे. पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. शिक्षक आणि पदवीधरसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्याची जागा चर्चेत होती. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरुन एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद होते. शिवसेनेने इथून मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन उमेदवारी मागे घेतली होती.