सोन्याच्या दरात घसरण सुरू असतानाच भविष्यातील भावाबाबत मोठी चर्चा रंगली आहे. 2027 मध्ये सोनं नवा विक्रम करणार की ग्राहकांना आणखी दिलासा मिळणार? तज्ज्ञांच्या अंदाजामुळे सध्या बाजारात उत्सुकता वाढली आहे! सोन्याच्या किमतीत अलीकडे घसरण होत असली, तरी आगामी काळात दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारातील काही अंदाजांनुसार, 2027 च्या अखेरपर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते.