Naseeruddin Shah: “तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावा, आमच्या देशातील तरुणांची हिंमत मोडणार नाही,” अशा आशयाचं विधान करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. त्यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.