सातारा : यावर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने. बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने वाटाणा, शेवगा यांच्या दरात तेजी आली आहे. किलोचा दर वाटाणा दोनशेच्या घरात तर शेवगा शंभरी पार झाला आहे. तर टोमॅटोचे दर घसरले असून किरकोळ विक्री १० ते २० रुपये किलोने होत आहे. .कष्टाने पिकवलेले पिक कवडी मोलाने विकावे लागत असल्याने टोमॅटोची लाली उतरली आहे.